Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आई जरीमरी अकॅडमीचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना महामारीच्या काळात बंद असलेले उद्योग व्यवसाय आत्ता पुर्व पदावर आले आहे. त्यापर्श्वभुमीवर दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर सुप्रसिद्ध गायक गणेश भगत आणि त्यांच्या सहकार्यांनी  ‘आई जरीमरी अकॅडमी’ सुरू केली आहे. या अकॅडमीचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी आई जरीमरी अकॅडमीच्या माध्यमातून उत्तम कलावंत घडतील, असा विश्वास व्यक्त केला.

कोरोना काळात बरेच कलावंत हे घरीच होते. कार्यक्रम नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. त्यात संगीत क्लासेस सुद्धा बंद होते. ऑनलाइन क्लासेस सुरू होते, परंतु प्रत्यक्षात क्लासेस घेता येत नव्हते त्यामुळे नवीन कलावंतांना शिक्षण घेण्यास समस्या येत होती, मात्र सर्व परिस्थिती पूर्व पदावर आली असून आता सर्व काही सुरळीत सुरू झाले आहे. त्यामुळे पनवेलमधील ज्यांना कलावंत व्ह्याचे आहे अशांना सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आई जरीमरी अकॅडमी सुरू झाली आहे.

ह्या अकॅॅडमीमध्ये संगीत, गायन, वादन अश्या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण सुरू केले आहे. या अकॅडमीचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रवी नाईक, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, मयूर ठक्कर आदी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply