पनवेल : रामप्रहर वृत्त
शिक्षणासोबतच कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या अनुषंगाने संस्थेचा दोन दिवसीय रौप्य महोत्सव समारंभ मंगळवारपासून
(दि. 13) खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.
यानिमित्त सायंकाळी 4 वाजता होणार्या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. सुहास पेडणेकर, राज्य उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. नरेश चंद्रा, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभणार असून, हा सोहळा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र पाटील, अनिल भगत, संजय भगत, वर्षा ठाकूर, नगरसेविका कुसुम पाटील, सीता पाटील, नगरसेवक एकनाथ गायकवाड, संजय भोपी, मनोहर म्हात्रे
आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाविद्यालयातून 25 वर्षांच्या कालावधीत उच्च शिक्षण घेऊन भरारी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असून, या वेळी विद्यार्थी, पालक व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, सहसचिव डॉ. नंदकुमार जाधव आणि सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बर्हाटे यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper