Breaking News

अलिबागच्या शर्विकाची आणखी एक उत्तुंग झेप; गुजरातचे गिरनार शिखर केले सर

अलिबाग ः प्रतिनिधी

अलिबागची चार वर्षीय बाल गिर्यारोहक शर्विका जितेन म्हात्रे हिच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. तिने गुजरातमधील सर्वात उंच गिरनार शिखर सर केले असून अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली कन्या ठरली आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचीवर वसलेल्या गिरनारच्या गुरुशिखर या सर्वोच्च स्थानी पोहचण्यासाठी पायथ्यापासून सुमारे 10 हजार पायर्‍यांचा टप्पा पार करावा लागतो. शर्विकाने सुमारे साडेपाच तासांनंतर गिरनार शिखरावर महाराष्ट्राचा स्वराज्य ध्वज आणि भारताचा राष्ट्रध्वज फडकावला. तिच्या या मोहिमेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply