पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष कामोठे शहर मंडल अंतर्गत विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकार्यांचा नियुक्तीप्रदान सोहळा मंगळवारी (दि. 19) झाला. कामोठे येथील भाजपच्या कार्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या वेळी त्यांच्या हस्ते पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. भाजपच्या कामोठे शहर उपाध्यक्षपदी राजेश म्हात्रे, चिटणीसपदी नारायण पोपेटा, ओबीसी सेल शहर अध्यक्षपदी भाऊ भगत व उपाध्यक्षपदी स्वप्नील म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना या वेळी नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, गोपीनाथ भगत, दिलीप पाटील, विकास घरत, विजय चिपळेकर, नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, हेमलता गोवारी, ओबीसी सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, भाजप जिल्हा संघटक सरचिटणीस अविनाश कोळी, युवा नेते हॅप्पी सिंग, सामाजिक कार्यकर्ते आर. जी. म्हात्रे, प्रदीप भगत, महिला मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष वनिता पाटील, महिला भटके विमुक्त महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विद्या तामखेडे, महिला मोर्चा कामोठे सरचिटणीस मनीषा वनवे, उपाध्यक्ष रमेश तुपे, युवा मोर्चा शहराध्यक्ष हर्षवर्धन पाटील, रावसाहेब बुधे, नाना मकदुम, उत्तम जाधव. ए. के. भगत, अॅड. सविन बंगेरा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …