Breaking News

पनवेलमध्ये आज मनोरंजन अनलॉक; भाजप सांस्कृतिक सेलतर्फे विविध कार्यक्रमांची मेजवानी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने मनोरंजन अनलॉक 2.0 पनवेल हा कार्यक्रम 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळानंतर पनवेलच्या रसिक प्रेक्षकांसाठी संगीत, नृत्य आणि नाटकांची यानिमित्ताने मेजवानी असणार आहे. या मनोरंजनात्मक कार्यक्रमात रत्नागिरी येथील कलांश थिएटर्स प्रस्तुत ‘बारस’ हे धम्माल विनोदी नाटक, स्टार प्लस वृत्तवाहिनीवरील डान्स प्लस फेम पनवेलकर ग्रुप आणि नृत्य आराधना कलानिकेतन ग्रुप आदई यांचे नृत्य, तर सामगंध पनवेल यांची सुरेल मैफल रंगणार आहे. या कार्यक्रमांसाठी विशेष उपस्थिती म्हणून भाजप सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष, लातूर मनपाचे गटनेते शैलेश गोजमगुंडे हे उपस्थित राहणार आहेत, तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिका महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप सांस्कृतिक सेलचे इतर काही प्रदेश व विभागीय प्रमुख पदाधिकारी, उत्तर रायगड आणि पनवेल भाजपचे पदाधिकारीदेखील उपस्थित राहणार आहे. ही माहिती सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी दिली. कोरोना नियमांचे पालन करून होणार्‍या या कार्यक्रमासाठी प्रवेश हा मोफत असून प्रवेशिका सोबत असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन (9029580343) किंवा गणेश जगताप (9870116964) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply