Breaking News

नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; नवीन पनवेलमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी प्राधान्य मिळत आहे. त्यामुळे येणार्‍या कालावधीत आपण सर्वांनी नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे शुक्रवारी
(दि. 17) केले. या वेळी त्यांच्या हस्ते सुमारे दोन कोटी 38 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ झाला.
पनवेल महापालिका क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यानुसार नवीन पनवेलमध्ये महापालिकेच्या माध्यमातून दोन कोटी 38 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ शुक्रवारी झाला. यामध्ये 83 लाख 81 हजार 749 रुपयांच्या निधीतून नवीन पनवेल सेक्टर 14 येथील कालिका मंदिरासमोरील जुने नादुरुस्त गटार तोडून नव्याने बांधणे, 99 लाख 39 हजार 571 रुपयांच्या निधीमधून सेक्टर 13 ए टाईपमधील मलनिःस्सारण वाहिन्यांचे नूतनीकरण, 56 लाख दोन हजार 650 रुपयांच्या निधीमधून सेक्टर 14 इ वन टाईपमधील मलनिःस्सारण वाहिन्यांचे नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन तसेच सेक्टर 14 होल्डिंग पॉईंट येथे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे उपलब्ध झालेल्या ओपन जिम आणि खेळण्यांच्या साहित्याचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत, अ‍ॅड. मनोज भुजबळ, माजी नगराध्यक्ष तथा नवीन पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेविका सुशिला घरत, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, भाजप नेते जगदीश घरत, अ‍ॅड. जितेंद्र वाघमारे, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर कदम, मंडळ उपाध्यक्ष नितीन चोरघे, विनायक कंकणवाडी, अभिजित दिवेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Check Also

सीकेटी कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर …

Leave a Reply