नवी मुंबई : दिवाळीपूर्वी नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाशीतील एकाच कुटुंबातील आई, मुलगा आणि मुलगी अशा तिघांनी सामूहिक आत्महत्या केली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 85 वर्षीय मोहिनी कामवानी, मुलगा दिलीप कामवानी (67) आणि मुलगी कांता कामवानी (61) यांनी तीन दिवसांपूर्वी विष प्राशन केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र तिघांचाही मृत्यू झाला. आर्थिक नैराश्येतून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …