Breaking News

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्या दोघांना अटक

पनवेल ः वार्ताहर

दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करणार्‍या दोन नराधमांना कामोठे पोलिसांनी गजाआड केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, हे आरोपी अल्पवयीन मुलींना घेवून भोसरी पुणे परिसरात लपले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार अपहरण मुलींच्या आईंना घेवून कामोठे पोलीस ठाण्याचे विशेष पथक सलग दोन दिवस त्या ठिकाणी वास्तव्यास राहून मोठ्या शिताफीने आरोपी आर्यन दिलीप चौधरी (23 रा.जुई गाव) व नेयाज अहमद हाशमी रा.भोसरी याला ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या दोघांच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply