Breaking News

कर्जतचे विकास त्रिभुवन यांचा बंगळुरूमध्ये सन्मान

कर्जत : बातमीदार

शहरातील विकास त्रिभुवन यांना बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशिओ इकॉनोमिक डेव्हलपमेंट या संस्थेने राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशिओ इकॉनोमिक डेव्हलपमेंट या संस्थेतर्फे दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षी बंगळुरू येथील ए. डी. ए. रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात कर्जत येथील विकास त्रिभुवन यांच्यासह देशातील 40 जणांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  संस्थेचे संस्थापक आणि नीती आयोगाचे सल्लागार डॉ. शिवप्पा पुट्टास्वामी, कर्नाटकच्या माजी मंत्री श्रीमती उमाश्री, ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान, तसेच प्रभाकर गोतारणे, कर्जतचे माजी नगरसेवक अरविंद मोरे, दीपक मोरे, रवींद्र घाडे आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply