पनवेल : रामप्रहर वृत्त
गव्हाण-कोपर येथील श्री गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने दिवाळी पहाटनिमित्त गुरुवारी (दि. 4) अभंग, भावगीत, भक्तीगीत व नाट्यगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता.
गायिका सुप्रिया ठाकूर-घर, पखवाज तुषार घरत, तबला मिलिंद कडू, टाळ जितेंद्र घरत यांनी सुमधूर गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतशेठ पाटील, माजी सरपंच पांडुशेठ घरत, माजी उपसरपंच रामदास ठाकूर, लालचंद घरत व गव्हाण-कोपर येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.