पनवेल : वार्ताहर
पनवेल परिसरात बांधकाम व्यावसायिक आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करणार्या एका महिला व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री बंबावीपाडा येथे घडली आहे. या घटनेत महिलेच्या पायाला गोळी लागली असून गोळीबार केल्यानंतर अज्ञात इसम पळून गेला. ही घटना समजतात पनवेल शहर पोलिसांचे पथकाने घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती घेतली.
पनवेल परिसरात बांधकाम व्यावसायिक आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करणार्या सौ. सुप्रिया गणेश पाटील (वय 30,रा.कोप्रोली, उरण) ह्या त्यांचा मावस भाऊ सर्वेश म्हात्रे सोबत त्यांच्या मित्राची निळया रंगाची मारुती सुझुकी बलेनो कार (एमएच 46 बीके 0698) ने पनवेल उरण जुन्या मार्गाने जात असताना बंबावीपाडा येथे एका अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून त्याचेकडील कोणत्यातरी अग्नीशस्त्राने सुप्रिया यांच्यावर गोळीबार करून पळुन गेला आहे. यामध्ये सुप्रिया यांच्या डावे पायाचे गुडघ्याखाली गोळी लागून जखमी झाल्याने त्यांना तात्काळ अपोलो रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. ही घटना समजतात पनवेल शहर पोलिसांचे पथकाने घटनास्थळी पोहचून त्यांनी घटनेची माहिती घेतली.
गोळीबार व्यावसायीक वादातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. दरम्यान, नुकतेच नेरूळ येथे बांधकाम व्यावसायिक सावजी पटेल यांच्यावर सुद्धा गोळीबार झाल्याची घटना घडली होती. एकाच महिन्यात दुसर्यांदा एका बांधकाम व्यावसायिकांवर गोळीबाराची घटना घडल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
Check Also
Midi Bbb Company Profile Bbb
Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …
RamPrahar – The Panvel Daily Paper