Breaking News

भाजपतर्फे मोहोपाड्यात दिवाळी पुर्वसंध्येला संगीतमय कार्यक्रम

मोहोपाडा : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष वासांबे (मोहोपाडा) यांच्या वतीने दिवाळी पुर्वसंध्या या सुमधूर संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या शिवांजली इमारतीच्या सभामंडपात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करून श्रीगणेश, महालक्ष्मी प्रतिमेला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत झाली.

या संगीत बहार कार्यक्रमातील सोनेरी क्षणांनी बहरलेली मराठी-हिंदी गीतांची सुरेल मैफलीचा आनंद घेत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी प्रसिद्ध संगीतकार गायक गौतम वैद्य यांनी दीपावली पुर्वसंध्येवर सुमधुर संगीत गीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या वेळी आमदार महेश बालदी, भाजपाचे तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, तालुका सरचिटणीस प्रवीण जांभळे, वासांबे विभाग अध्यक्ष सचिन तांडेल यांनी वाहवा करून गायक गौतम वैद्य यांचा सुमधुर आवाजाची स्तुती केली.

या वेळी माजी सरपंच विजय मुरकुटे, मोहोपाडा व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज सोमाणी, असोसिएशनचे सचिव अमित शहा, भाजप तालुका कार्यकारिणी सदस्य भरत मांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड, हभप कर्णेकर महाराज, चांभार्ली पंचायत समिती अध्यक्ष भुषण पारंगे, वासांबे मोहोपाडा पंचायत समिती अध्यक्ष आकाश जुईकर, चांभार्ली पंचायत समिती उपाध्यक्ष प्रमोद जांभळे, पोयंजे पंचायत समिती अध्यक्ष प्रवीण ठाकूर, ज्येष्ठ नेते अनिल गीध, युवा नेते केतन जाधव, विशाल मुंढे, प्रमोद खारकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष चौधरी यांनी पाहिले.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply