Breaking News

स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या मैफिलीत पनवेलमध्ये आज दिवाळी पहाट

पनवेल : रामप्रहर वृत्त

रसिक श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा मोर्चा पनवेलच्या वतीने शुक्रवारी (दि. 5) सकाळी 6 वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल ’दिवाळी पहाट’ हा  सुमधूर संगीत कार्यक्रम होणार आहे.

सोनेरी पहाट आणि सुरांची सुरेल बरसात असे दिवाळी पहाटचे  एक अनोखे नाते आहे. मराठी-हिंदी भावस्पर्शी गाण्यांनी दिवाळीची पहाट सुरेल करण्याची परंपरा जपायला मराठी रसिकांना आवडते. त्यामुळे दिवाळी पहाटेचा हा अनुभव पुढील अनेक दिवसांसाठी नवा उत्साह देणारा ठरतो. त्या अनुषंगाने सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. दिवाळी पहाटचे हे पाचवे वर्ष असून पनवेल शहरात वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाने पनवेलच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. दिवाळी पहाट कार्यक्रम त्या ठिकाणी प्रथमच होत असल्याने रसिकांच्या मनात कार्यक्रमाची उत्सुकता भरली आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply