Breaking News

कर्जतमध्ये रंगली दिवाळी पहाट

नवोदित कलाकारांच्या गीतांवर श्रोते मंत्रमुग्ध

कर्जत : प्रतिनिधी

कोरोना काळात खंडित झालेला प्रत्यक्ष संगीत मैफिल ऐकण्याचा आनंद पुन्हा अनुभवण्यासाठी अनाहत  या संस्थेच्या वतीने गुरुवारी (दि. 4) ’निरामयदीप’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नवोदित गायकांनी सादर केलेल्या गीतांनी कर्जतकर संगीतप्रेमी मंत्रमुग्ध झाले.

कर्जतमधील महिला मंडळ सभागृहात अनाहत संस्थेच्या वतीने गुरुवारी पहाटे निरामयदीप या शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. अक्षय वर्धावे यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनतर स्वाती गुरव यांनी भैरव रागातील ध्यान लागले रामाचे…, दिविजा पुरोहित यांनी नट भैरव रागातील निजरूप दाखवा हो…, मनाली जोशी यांनी देशकार रागातील अबीर गुलाल…, अक्षय वर्धावे यांनी गौड सारंग रागातील लक्ष्मी बारम्मा…, अशी अनेक गीते सादर करून मैफलीत रंगत आणली. त्यांना संवादिनीवर ऋतुजा कर्वे तर तबल्यावर अतुल गोडसे यांनी साथ संगत दिली. सूत्रसंचालन सानिका कर्वे यांनी केले.

विजय बेडेकर, श्रीराम पुरोहित, राहुल वैद्य, मृदुला गडणीस, दीपक करोडे, प्रसाद पाटील, जान्हवी मुळे, सुचिता वांजळे, ईश्वर आरेकर, राजीव मुळेकर, किशोर वैद्य, सुहास कर्वे, मानसी कर्वे, दिनकर वैद्य यांच्यासह रसिक श्रोते या वेळी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply