Breaking News

कोरोनामुळे इतर रोगांच्या रुग्णांत घट

पनवेल : वार्ताहर

दरवर्षी उन्हाळ्यात उदभवणार्‍या आजारांच्या तुलनेत यावर्षी लक्षणीय घट झाली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असले तरी दरवर्षीच्या तुलनेत इतर आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

कोरोनामुळे मागील वर्षभरापासून लॉकडाऊन तसेच वर्क फ्रॉम होममुळे मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग घरूनच ऑनलाइन काम करीत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडण्यासदेखील बंधने आली आहेत. सध्याच्या घडीला केवळ सकाळी 11 वाजेपर्यंतच घराबाहेर पडता येत असल्याने उन्हाच्या तडाक्यापासून अनेकांचे रक्षण झाले असुन उन्हाळ्यात जाणवणारा उष्माघाताचा त्रास या व्यतिरिक्त उकाड्यापासून होणारे आजाराचे रुग्ण कमी पहावयास मिळत आहेत.

पनवेल तालुक्यात 20 कोविड रुग्णालये आहेत. याठिकाणी कोविड रुग्णांची संख्या मोठी आहे. आजवर तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त नागरिकाची कोविडची तपासणी केली आहे. यामध्ये  पालिका क्षेत्रात 52137 रुग्णांनी कोविडवर यशस्वी मात केली आहे, तर पालिका क्षेत्रांत सध्याच्या घडीला 2022 विद्यमान रुग्ण आहेत. 1047 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त तालुक्यातील नॉन कोविड रुग्णावर उपचार सुरू आहेत. यामध्ये बहुतांशी मूत्रपिंडाशी संबंधित, टायफाईड व काविळच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. उष्माघातामुळे होणारे आजार यामध्ये कांजण्या, उलट्या जुलाब, घामोळ्या, गजकर्ण, त्वचेचे आजार, अर्धशीषीसारख्या बाधीत रुग्णांची संख्या खालावली आहे.

मे महिन्यात पनवेलमध्ये तापमान 37 पर्यंत पोहचले आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याचीही शक्यता आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हेच तापमान 34पर्यंत होते. सध्याच्या घडीला वादळाचा फटका बसला असुन सोसाट्याचा वारा दोन दिवस सर्वांना अनुभवण्यास मिळत आहे. तालुक्यात दोन दिवस पाऊसदेखील पडत आहे. मान्सुन दाखल होण्यास अद्याप 15 ते 20 दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे या दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यातील आजार झाले कमी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत विविध निर्बंध घातली गेली होती. यामध्ये लॉकडाऊन, संचारबंदी आदी उपाययोजनावर भर देण्यात आलेला होता. त्यामुळे उन्हाळ्यात घरीच थांबण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने उन लागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याने यावर्षी उन्हाशी संबंधित आजारांची संख्या कमी झाल्याचे दिसुन आले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply