Breaking News

कितीही संकटे आली, तरी दिवाळी अंकांची परंपरा खंडित होणार नाही -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त 

कितीही संकटे आली तरी दिवाळी अंकांची परंपरा खंडित झालेली नाही आणि होणार नाही, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 3) दिवाळी विशेषांकाच्या प्रकाशनाच्या वेळी व्यक्त केला.

ज्येष्ठ पत्रकार संजय कदम संपादित 18व्या ‘श्री. स्वामी समर्थ’, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी संपादित ‘पनवेल टाइम्स’, पत्रकार निलेश सोनावणे संपादित ‘पनवेल युवा’, पत्रकार केवल महाडिक संपादित ‘कोकण संध्या’, पत्रकार अनिल भोळे संपादित ‘रसायनी टाइम्स’ या दिवाळी विशेषांकांचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी मठाधिपती सुधीरभाऊ घरत, प्रभाग समिती ड सभापती सुशिला घरत, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, दीपक महाडिक, रमेश भोळे, सय्यद अकबर, प्रशांत शेडगे, सुमंत नलावडे, दीपक घोसाळकर, अनिल कुरघोडे, गणपत वारगडा, राज भंडारी, विशाल सावंत, प्रवीण मोहोकर, असीम शेख, दिनेश गिल्डा, रवींद्र गायकवाड, सनीप कलोते, सुमेधा लिम्हण, कवयित्री ज्योत्स्ना राजपूत, सुनिता रामचंद्र आदी उपस्थित होते. वाचकांची अभिरूची समृद्ध करण्याचे काम दिवाळी अंकांनी सातत्याने केले. त्यामुळे वाचक संस्कृती वृंद्धिगत होण्याबरोबरच परंपरा टिकवण्याचे काम या माध्यमातून होत आहे, असेही त्यांनी नमूद केले. दिवाळीतील मेजवानी आणि खास मराठी संस्कृतीची ओळख असलेले दिवाळी अंक करोनाची छाया व आर्थिक प्रश्न यातून वाट काढत प्रसिद्ध झाले, ही बाब मराठी मनाला अभिमान वाटावा अशी आहे. त्यामुळे दिवाळी अंकांसाठी मेहनत घेणारी संपादक टीम अभिनंदनास पात्र आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अधोरेखित करत सर्वांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply