Breaking News

उद्याने सुरू करण्यासाठी मुख्याधिकार्‍यांना निवेदन

पेण ः प्रतिनिधी

अनलॉकच्या प्रक्रियेस बराच कालावधी होऊनही पेणमधील सर्व उद्याने बंद आहेत. कोविडमधून बरे झालेले रुग्ण तसेच आबालवृद्धांना मोकळ्या हवेत फिरून नैसर्गिकरीत्या श्वसनातून येणार्‍या ऑक्सिजनची मात्रा वाढविणे गरजेचे आहे. पेण शहरात छोटी छोटी उद्याने, क्रीडांगणे असून ती सहा महिन्यांपासून बंद आहे. याबाबत ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या व योगा फॉर जॉय गटाच्या प्रमुख डॉ. वैशाली पाटील यांनी लोकाग्रहास्तव थीम पार्क खुले करण्यासंबंधी मुख्याधिकारी अर्चना दिवे यांना निवेदन दिले आहे. या वेळी वर्षा गुढदे, रुची महलकर, डॉ. पाटील उपस्थित होते.

पेण शहरात सांस्कृतिक उत्सवाच्या परंपरेबरोबरच योगा, व्यायामशाळा, जिम याबाबत जनता सजग आहे. म्हणूनच पेण न.पा सभागृहात निसर्ग योगा क्लास, श्री गुरू मांजरेकर संचालित हास्य क्लब तसेच श्रीमती सुर्वे यांच्यामार्फत सुरू असलेला पतंजली योगा, मुलांचे क्रिकेट क्लब ही शारीरिक व्यायामाची साधने उपलब्ध आहेत, परंतु लॉकडाऊनच्या काळात यावर मर्यादा पडल्या.

याबाबत डॉ. पाटील म्हणाल्या की, योगाप्रेमींसाठी योगगुरू हेमंत गव्हाणकर यांनी ऑनलाइन योगा सुरू केला आहे. याचा लाभ नागरिक घेत असले असले तरी अनेक वृध्द, तरुण मंडळी व महिलांना फिरण्यासाठी व चालण्यासाठी खुले मैदान असणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य ती बंधने घालून मोकळी मैदाने, गार्डन व क्रीडांगणे सुरु होणे गरजेचे आहे. याबाबत मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी शासनाच्या आदेशानुसार पेणमधील मैदाने व गार्डन सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे व्यायामप्रेमी जनतेतून आनंद व्यक्त केला जात आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply