Breaking News

पोलादपुरातील कालवली मशिदीत हिंदू बांधवांनी पढला नमाज

पोलादपूर : प्रतिनिधी

देशात हिंदू-मुस्लिम ऐक्यासंदर्भात वेगवेगळ्या घटनांची चर्चा सुरू असताना पोलादपूर तालुक्यातील कालवली जामा मशिदीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (दि. 4) सकाळी परिसरातील हिंदू बांधवांनी नमाज अदा केली. 65 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ही परंपरा सुरू आहे.

मशिदीमध्ये हिंदू बांधवांनी नमाज अदा केल्याबद्दल कालवली वलीले मोहल्ल्यातील अब्दुलहक खलफे, महमद उस्मान खलफे, मुराद इब्राहिम वलिले, अब्दुर्रज्जाक खलफे, कालवली गावाचे इमाम मौलाना अखलाख यांनी आनंद व्यक्त केला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांच्या हस्ते हिंदू बांधवांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply