Breaking News

कर्जत धाबेवाडीमध्ये दिवाळी; महिलांना भाऊबीज

कर्जत : बातमीदार

आदिवासी सेवा संघाच्या वतीने कर्जत तालुक्यातील धाबेवाडीमध्ये दिवाळी सण साजरा करण्यात आला. या वेळी खांडस भागातील आदिवासी वाड्यांमधील आशा सेविका, अंगणवाडी सेविकांचा सत्कार आणि आदिवासी महिलांना साडी चोळी देऊन भाऊबीज साजरी करण्यात आली.

कोरोना काळात काम करणार्‍या आशा सेविका रंजना चिमण पादिर, बबिता पांडुरंग पादिर, स्वाती चंद्रकांत इष्टे, सोना विजय निर्गुडे, शोभा बांगारे यांचा आणि अंगणवाडी सेविका जाई अनंता हिंदोळे, रंजना आबाजी, नीता सुरेश कोरडे, सुनील रवींद्र इष्टे, योगिता लहू खंडवी, बंदिनी राहुल हिंदोला, गीता पांडुरंग झुगरे, चंपा विजय खडके यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. 19 वर्षाखालील महाराष्ट्र राज्य कबड्डी संघातून खेळलेल्या विशाल गिरा याचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी धाबेवाडीमधील सर्व आदिवासी महिलांना साडी, चोळी आणि मिठाई भेट देत भाऊबीज साजरी करण्यात आली.

आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष बुधाजी हिंदोला, उपाध्यक्ष भगवान भगत, जिल्हा सचिव गणेश पारधी, तालुका अध्यक्ष जैतु पारधी, विलास भला, सुरेश निर्गुडा, भाऊ मेंगाळ, भाऊ केवारी, बाळू ठोंबरे, चंद्रकांत पारधी, बाळू कुंटे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम हिंदोला, रेखा मेंगाळ, आदिवासी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष भरत शिद, सरकारी कर्मचारी देहू कवटे, गणेश पादिर, राजेंद्र निर्गुडा, किसन ढोले आणि संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आदिवासी सेवा संघाचे गोविंद बांगारे,भरत बांगारे, वामन बांगारे, चंदर बांगारे, सोमेश हिंदोला, पांडुरंग मेगाळ, भास्कर बांगारे, सुनील सावळा आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply