Breaking News

आपटे फाटा शिवमंदिरात दर्शनासाठी अभिनेता हृतिक रोशनची उपस्थिती

पनवेल : वार्ताहर

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्रीचे औचित्य साधून हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध सिनेअभिनेते हृतिक रोशन व त्यांचे वडील राकेश रोशन यांनी पनवेलजवळील आपटे फाटा येथे असलेल्या त्यांच्या आजोबांनी बांधलेल्या शिवमंदिराचे सहकुटूंब दर्शन घेतले. दरवर्षी रोशन कुटूंबिय महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचे आजोबा जे. ओमप्रकाश यांनी पनवेल जवळील आपटे फाटा येथे बांधलेल्या शिवमंदिराचे दर्शन व विधीवत पूजा करण्यासाठी येत असतात आजही हृतिक रोशन, राकेश रोशन तसेच हृतिक रोशनची मुले आणि इतर कुटूंबिय एकत्र येऊन शिवमंदिराचे दर्शन घेतले. तसेच विधीवत पूजाअर्चा केली. त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. हृतिक रोशन टी-शर्ट, जीन्स व कॅप परिधान करून आला होता. तर राकेश रोशन यांनी सफेद शर्ट अशा साध्या पेहराव्यात आले होते. या सर्वांनी उपस्थितांना हात उंचावून नमस्कार केला व नंतर मुंबई बाजूकडे ते रवाना झाले.

Check Also

पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा

२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply