Breaking News

टी-20 विश्वचषक 2022 : भारत थेट सुपर 12 मध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्‍या टी-20 विश्वचषक 2022 साठी थेट सुपर 12 क्वालिफायर्समध्ये प्रवेश करणार्‍या आठ संघांची आयसीसीने घोषणा केली आहे. या आठ संघांमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा समावेश आहे. सध्याच्या विश्वचषकात फायनल खेळणार्‍या दोन संघांव्यतिरिक्त, आयसीसी क्रमवारीतील सहा सर्वोत्तम संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत थेट सुपर 12 मध्ये प्रवेश मिळेल. सुपर 12 मध्ये रँकिंगनुसार क्वालिफाय करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर आहे. दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून पराभव केला आणि पुढील विश्वचषकातली सुपर 12 पैकी आठ संघ निश्चित झाले. या पराभवामुळे वेस्ट इंडिज क्रमवारीत दहाव्या; तर बांगलादेशचा संघ आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत इंग्लंड, पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया टॉप सहा संघ आहेत; तर अफगाणिस्तान सातव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान शेवटचा सामना हरेल तरीही ते क्रमवारीत 8व्या क्रमांकाच्या खाली जाणार नाही. पुढील वर्षी होणार्‍या टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडिजचा संघ आता पहिल्या फेरीत श्रीलंका, नामिबिया आणि स्कॉटलंडच्या संघाशी खेळणार आहे. वेस्ट इंडिजच्या संघाची या विश्वचषकात कामगिरी अत्यंत खराब राहिली. वेस्ट इंडिजला पाच पैकी चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply