Breaking News

दक्षिण अफ्रिकेचा इंग्लंडवर 10 धावांनी विजय

शारजा : वृत्तसंस्था

र्‍हासी वॅन डर डुसेनची (60 चेंडूत नाबाद 94) उत्कृष्ट फलंदाजी आणि कॅगिसो रबाडाच्या (3/48) हॅट्ट्रिकमुळे दक्षिण आफ्रिकेने शनिवारी ट्वेन्टी-20 विश्वचषकातील ‘गट-1’मधील अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा 10 धावांनी पराभव केला. शारजा येथे झालेल्या या सामन्यात आफ्रिकेने दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 षटकांत 8 बाद 179 धावाच करता आल्या. सलामीवीर जेसन रॉय (20) आणि जोस बटलर (26) यांनी आक्रमक सुरुवात केली. रॉयला पायाच्या दुखापतीमुळे माघारी परतावे लागले. बटलर आणि जॉनी बेअरस्टो (1) बाद झाल्यावर मोईन अली (37) आणि डेविड मलान (33) यांनी फटकेबाजी केली. मग लियम लिव्हिंगस्टोन (28) आणि कर्णधार ईऑन मॉर्गन (17) यांनी इंग्लंड विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आले. तत्पूर्वी, आफ्रिकेने 20 षटकांत 2 बाद 189 अशी धावसंख्या उभारली. रीझा हेन्ड्रिक्स (2) लवकर बाद झाल्यावर क्विंटन डीकॉक (34) आणि डुसेन यांनी दुसर्‍या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर डुसेन आणि एडिन मार्करम (नाबाद 52) यांनी 103 धावांची फटकेबाज भागीदारी केल्याने आफ्रिकेने मोठी धावसंख्या उभारली.

Check Also

साऊंड सिस्टिम व्यावसायिकांना नियमांच्या चौकटीत व्यवसायाची संधी द्यावी

असोसिएशनचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन; सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्तआगामी दहीहंडी, …

Leave a Reply