मुंबई : ’बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वांना स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र दिला आहे’, असे सूचक विधान करत भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या स्मृतिदिनी आदरांजली वाहिली. या वेळी फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. स्वाभिमान आणि हिंदुत्वाचा बाणा कधीही सोडू नका. नावाला जपा, नाव मोठे करा, असा संदेश या व्हिडीओत बाळासाहेब देताना दिसत आहेत. या ट्विटद्वारे आदरांजली वाहताना फडणवीस यांनी शिवसेनेला हिंदुत्वाची आठवणही करून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper