Breaking News

भारतीय खेळाडूंची स्कॉटलंडच्या ‘ड्रेसिंग रूम’ला भेट

दुबई : वृत्तसंस्था

कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघातील खेळाडूंनी ट्वेन्टी-20 विश्वचषकात शुक्रवारी झालेल्या सामन्यानंतर स्कॉटलंडच्या ‘ड्रेसिंग रूम’ला भेट दिली. विराट, रोहित, जसप्रीत बुमरा आणि रविचंद्रन अश्विन यांनी स्कॉटलंड संघातील खेळाडूंशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. ‘विराट कोहलीसह भारतीय खेळाडूंनी वेळ काढून आमच्या खेळाडूंशी संवाद साधल्याबद्दल आभार,’ असे स्कॉटलंड क्रिकेट मंडळाने ‘ट्वीट’मध्ये म्हटले आहे, तसेच त्यांनी भारत आणि स्कॉटलंडचे खेळाडू संवाद साधतानाची छायाचित्रे प्रसिद्ध करताना त्याखाली ‘अमूल्य’ असे लिहिले. भारताने या सामन्यात उत्कृष्ट खेळ करताना आठ गडी राखून मोठा विजय मिळवला. स्कॉटलंडचा डाव 85 धावांत आटोपल्यावर भारतीय संघाने हे लक्ष्य अवघ्या 6.3 षटकांत गाठले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply