Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या वेळी जभशिप्र संस्थेचे सदस्य संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाकर जोशी, दीपक शिंदे, सचिन वासकर, जयदास तेलवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर रामशेठ ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या दुर्गोदेवी मौर्या, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. नमिता अखौरी यांने केले. या वेळी प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी प्रजासत्ताक दिन, संविधानाचे हक्क व त्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सफिना मुकादम यांनी केले, तर प्रा. प्रवीण सावे यांनी आभार मानले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply