Breaking News

केगावमध्ये काँग्रेस, शेकापला खिंडार; पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

उरण : रामप्रहर वृत्त

उरण तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या केगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील काँग्रेस आणि शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहिररीत्या गुरुवारी (दि. 24) प्रवेश केला आहे. 15 जानेवारी 2021 रोजी होऊ घातलेल्या केगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतच युवा पदाधिकार्‍यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्याने केगाव ग्रामपंचायत हद्दीत भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे. केगाव ग्रामपंचायत हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस पक्षाचे युवा तालुकाध्यक्ष अक्षय अशोक पाटील सह अतुल अशोक पाटील, दर्शन नारायण पाटील, प्रितेश पद्माकर पाटील, केतन रामचंद्र पाटील, प्रशांत नथुराम पाटील, हर्षद व्दारकानाथ पाटील या काँग्रेस आणि शेकाप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीररीत्या पक्ष प्रवेश केल्याने आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयवंत कोळी, नगरसेवक राजेश ठाकूर, भाजपचे तालुका सरचिटणीस सुनील पाटील, बांबू काटे, माजी नगरसेवक सुनील गावंड, केगाव भाजप विभाग प्रमुख विलास काठे, अरविंद पवार, मयूर म्हात्रे, बळवंत ठाकूर, मिलिंद पाटील, मंगेश पाटील, प्रशांत दर्णे, विलेश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply