Breaking News

कळंबमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का

समर्थकांसह शाखाप्रमुखाचा ‘जय महाराष्ट्र’

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील कळंब गावातील शिवसेनेचे संस्थापक असलेल्या मिरकुटे कुटुंबातील कार्यकर्त्यांनी शिवसेनाला जय महाराष्ट्र केला. शाखाप्रमुखासह शिवसैनिकांनी पक्ष सोडल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का समाजाला जात आहे.

कळंब ग्रामपंचायत हद्दीमध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून खर्‍या अर्थाने पक्षाची पाळेमुळे रुजविणारे प्रमोद मिरकुटे यांचे पुतणे उमेश प्रवीण मिरकुटे, त्यांचे सहकारी अन्वर बुबेरे यांचे चिरंजीव रईस बुबेरे, सचिन चोनकर, शिवसेनेचे 15 वर्षे शाखाप्रमुख जनार्दन बदे, तसेच सागर बदे, ज्ञानेश्वर बदे, रोजप लोगडे, अविनाश भोईर, नवीन परदेशी, प्रभू धुळे, मोहन पारधी, रवींद्र बनसोडे, प्रभाकर बनसोडे, आदी कट्टर शिवसैनिकांनी स्थानिक नेतृत्वाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

कर्जत येथील राष्ट्रवादी भवन येथे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा

२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply