रसायनी : प्रतिनिधी
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील तळवली येथील शेतकर्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यासाठी कृषी खात्याकडून शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळा सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी असल्यामुळे शेतकरी वर्गासाठी कृषी खात्याच्या माध्यमातून गावांमध्ये शेतकर्यांसाठी क्रॉपसॅप योजनेंतर्गत शेतीविषयक माहिती पुरविण्याचे काम कृषी अधिकारी करीत आहेत. खरीप हंगाम सुरू होत असताना शेतकरी वर्गाने पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करण्यास भर दिला पाहिजे या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर कृषी अधिकारी काम करीत आहेत. यामुळे तालुक्याच्या ठिकाणी कृषी खात्याच्या माध्यमातून कार्यशाळा राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमास शेतकरी वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
शेतकरी वर्ग शेती करीत असताना त्याला सुद्धा आधुनिक शेती, तसेच कृषी खात्याच्या माध्यमातून विविध योजना शेतकरी बांधवांपर्यंत कशा पोहचल्या जातील यासाठी कृषी खाते गावोगावी कार्यशाळा घेत आहे. सध्याचे युग बदलत असल्यामुळे शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडत आहे, मात्र दिवसेंदिवस शेती कमी होत असल्यामुळे शिवाय शासनांच्या योजना तळागाळापर्यंत पोहचत नसल्यामुळे आज कृषी खाते जागृत राहून शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शेतकरी बांधवांना ज्या योजना हव्या आहेत त्यासाठी कृषी खाते सहकार्य करून शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवून काम करीत आहे.
खरीप हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसाचा अवधी असून कृषी खाते गावोगावी शेतकर्यांच्या भेटी घेऊन गावातील शेकडो शेतकरी यांना मार्गदर्शन करीत आहेत. शेतातील उत्पन्न वाढवावे किंवा आपण आपल्या शेतामधून कोणती पिके आणिक जास्त प्रमाणात घेऊ शकतो यांचे सखोल मार्गदर्शन केले. या वेळी कृषी खाते यांची टीम उपस्थित होती. या वेळी बीटीएम प्रज्ञा पाटील, कृषी साहाय्यक नितिन महाडिक, माजी भात संशोधन अधिकारी पाटील, तर शेतकर्यांमध्ये मधुकर दा. मालकर, जे. के. मालकर, बाळाराम मालकर, देविदास मालकर, रामदास बडेकर, पोलीस पाटील मारुती पाटील, जितेंद्र जाधव, हनुमंत मालकर, लहू लबडे, महादू मालकर, जनार्दन बडेकर, हरिभाऊ मालकर, रूपेश मालकर, अनंता मालकर, भरत मालकर, अंकुश मालकर, रोहिदास मालकर, मोहन मालकर, गणेश मालकर, भारती मालकर, राखी मालकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– खरीप हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसाचा अवधी आहे, शिवाय जिल्ह्यात भाताचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जात असते, मात्र भातशेती पारंपरिक न करता अधुनिक पद्धतीने करता यावी, शिवाय शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचाव्या या दृष्टिकोनातून क्रॉपसॅप योजनेंतर्गत तळवळी येथे संलग्न भात शेतीशाळेचे आयोजन कृषी खात्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
-नितिन महाडिक, कृषी साहाय्यक खालापूर