Breaking News

‘सीकेटी’च्या ओलीनने घेतली रशियामधून एमबीबीएसची डिग्री

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे घेतले आशीर्वाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या ओलीन राज एन. डी. हा रशियामधून एमबीबीएसची डिग्री घेऊन डॉक्टर झाला. त्याच्या या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक करुन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी ओलीन याने त्यांचे आशीर्वाद घेतले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने माझा मुलगा डॉक्टर झाला असल्याचे ओलीनच्या वडीलांनी सांगितले. ते म्हणाले की, आर्थिक परिस्थिती नव्हती पण मुलाला डॉक्टर बनवायचे होते. मी रामशेठ ठाकूर यांना   जाऊन भेटलो आणि मुलाच्या शिक्षणाकरिता मदत मागितली. ठाकूर साहेबांनी मागे पुढे न पाहता शिक्षणाकरिता भरीव मदत केल्याचे ओलीनच्या वडीलांनी सांगितले. ओलीनने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. माझ्या मुलाच्या या यशात रामशेठ ठाकूर साहेबांचा मोठा वाटा असल्याचे ओलीन राजच्या वडीलांनी सांगितले.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply