175 जणांचा सहभाग; वसुधा बुंधाटे प्रथम
कर्जत : बातमीदार
भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत यांच्या पुढाकाराने बालकलाकारांसाठी किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तब्बल 175 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
या स्पर्धेतील बालकलाकारांनी जंजिरा किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, प्रतापगड, लोहगड, तोरणा आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. परिक्षकांनी गावोगावी जावून किल्ल्यांचे परिक्षण केले. या स्पर्धेत वसुधा दीपक बुंधाटे हिने पहिला क्रमांक पटकावला, तर माई संकेत चांना दुसरी आणि अभिषेक प्रकाश थोरवे तिसरा आला. त्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. रमेश झुगरे, लावण्या मदन पाटील, चेतन गायकर, अथर्व मंगेश देशमुख, आम्ही पोशिरकर, नुपूर राजाराम रसाळ आणि दैविक अरुण मोरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आली.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ डिकसळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झाला. भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, तालुका सरचिटणीस राजेश भगत, संजय कराळे, भाजप किसान मोर्चा कोकण विभाग संघटक सुनील गोगटे, भाजप महिला मोर्चाच्या नेरळ शहर अध्यक्षा नम्रता कांदळगावकर, भाजप तालुकास्तरीय पदाधिकारी मारुती गायकवाड, विजय कुलकर्णी, संदेश कराळे, सर्वेश गोगटे, मिनेश मसणे, रोशन पाटील, मंगेश सुळे, किशोर गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ आणि स्पर्धक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.