पनवेल : रामप्रहर वृत्त
येथील पंचशीलनगर झोपडपट्टीमध्ये राहणारे मंगेश रामचंद्र पराड यांच्या झोपडीला 26 जानेवारी रोजी आग लागली होती. या आगीमध्ये मंगेश पराड यांची झोपडी व सर्व सामान जळून खाक झाले. त्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 10 हजार रुपयांची मदत केली आहे. यासाठी प्रभाग क्र. 17च्या नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी प्रयत्न केले. या वेळी जितेंद्र वाघमारे, अशोक आंबेकर, शैला आंबेकर आदी उपस्थित होते.