Breaking News

कर्जत आगारातील सर्व कामगारांचे आंदोलन

कर्जत : बातमीदार

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे आणि कामगारांचे थकीत वेतन, भत्ते, सवलती त्वरित लागू कराव्यात या मागण्यांसाठी सर्व कामगार संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी (दि. 8) कर्जत एसटी आगारातून एकही गाडी धावली नाही.

आपल्या प्रलंबीत मागण्यांची तड लावण्यासाठी राज्या परिवहन महामंडळातील सर्व कामगार संघटनांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून राज्यव्यापी बंद पुकारला आहे. या आंदोलनात कर्जत आगारातील सर्व एसटी कार्मचारी  सहभागी झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारी दिवसभरात एकही एसटी बस कर्जत आगारातून बाहेर पडली नाही.  या सर्व कामगारांनी कर्जत आगारात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आठवड्याचा आणि दिवाळी सुट्टी नंतरचा पहिला दिवस असल्याने शासकीय कामांसाठी घराबाहेर पडलेल्या ग्रामस्थ, नागरिकांचे हाल झाले. त्यांना जास्त भुर्दंड सहन करीत खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागला.

दरम्यान, एसटी कामगारांच्या या राज्यव्यापी संपाला कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला आहे. भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे यांनी कर्जत आगारात जावून एसटी कामागरांसोबत चर्चा केली.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply