Breaking News

भव्य किल्ले स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावलीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘भव्य किल्ले स्पर्धा 2021’चे पारितोषिक वितरण झाले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली. यात प्रथम नवीन पनवेल येथील राजे शिवराय प्रतिष्ठान, द्वितीय रामश्री मित्र मंडळ, तर कट्टा गँग पनवेलने तृतीय क्रमांक पटकाविला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. भव्य किल्ले स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष होते. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सात हजार रुपये, द्वितीय पाच हजार रुपये, तृतीय तीन हजार रुपये असे होते. एकूण सर्व विजेत्यांना 45 हजारांची पारितोषिके व आकर्षक चषकने सन्मानित करण्यात आले. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, शहराध्यक्ष रोहित जगताप, गौरव कांडपिळे, उदित नाईक आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply