पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरपूरला जोडणार्या सुमारे 225 किलोमीटर लांबीच्या पालखी मार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह वारकर्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग स्वरूपात उपस्थिती लावली. या वेळी पंतप्रधान मोदींनी ‘माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी’ या ओळींचा जयघोष करत उपस्थितांना संबोधित केले. या पालखी मार्गामुळे भगवान विठ्ठलाच्या सेवेसोबतच, विकासालादेखील चालना मिळणार असल्याचे मोदींनी सांगितले. पंढरपूरला जोडणार्या या महामार्गासाठी प्रयत्न करणार्या सर्वांचे अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …