Breaking News

रोह्यात पाच वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

धाटाव : प्रतिनिधी

एका पाच वर्षांच्या बालिकेवर 36 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि. 7) संध्याकाळी रोहे शहरात घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

रोहा शहरातील पार्टे चाळीत राहणारी पाच वर्षांची मुलगी रविवारी संध्याकाळी आपल्या घराच्या अंगणात खेळत होती. खेळता-खेळता ती अचानक बेपत्ता झाल्याचे नातेवायिकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्या मुलीच्या नातेवाईकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी राकेश शिर्के (वय 36) या नराधमाने मुलीला स्वतःच्या घरी नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी चाळीचे मालक चंद्रकांत पार्टे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यावरून आरोपी राकेश शिर्के याच्या विरुद्ध भादंवी कलम 376, 378(2)(आय)(आय), 376 (3), 363 अन्वये रोहा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक तृप्ती बोराडे करीत आहेत.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply