Breaking News

विनाहेल्मेट 8488 दुचाकीस्वारांवर कारवाई

पनवेल : वार्ताहर

नवी मुंबई वाहतूक शाखेने विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्‍या चालकावर तसेच विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणार्‍या व्यक्तींविरोधात विशेष मोहीम राबवून त्यांच्यावर धडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार वाहतूक शाखेने 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विशेष मोहिमेद्वारे एकूण 8488 विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्‍या चालकावर तसेच विनाहेल्मेट दुचाकीवर मागे बसणार्‍या व्यक्तींवर कारवाई केली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी वाहनांच्या अपघातांत तसेच त्यातील मृतामध्ये वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. यातील बहुतांश अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसणार्‍या व्यक्तीलासुद्धा हेल्मेट घालणे गरजेचे झाले आहे. असे असतानाही अनेक दुचाकी चालक हेल्मेट घालत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक शाखेने विना हेल्मेट दुचाकी चालविणार्‍या चालकावर 29 ऑक्टोबरपासून विशेष मोहिम सुरू केली आहे. यात विनाहेल्मेट दुचाकीवर मागे बसणार्‍या व्यक्तींवरदेखील कारवाई करण्यात आली. त्यानुसार 29, 30, 31 ऑक्टोबर, 1, 2, 8 नोव्हेंबर रोजी एकूण 8488 दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत दुचाकी चालविताना चालकाने आणि दुचाकीस्वाराबरोबर मागे बसलेल्या व्यक्तीने डोक्यावर हेल्मेट घालून सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.

-पुरुषोत्तम कराड, पोलीस उपायुक्त, नवी मुंबई वाहतूक शाखा

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply