Breaking News

सिंधुदुर्ग संघाच्या वतीने अनाथांना फराळ वाटप

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेल या संस्थेच्या वतीने पनवेल परिसरातील आदिवासी वस्ती व अनाथ मुलांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आला. कार्यकारिणीच्या वतीने संघाच्या सभासदांना फराळ देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सभासदांनी आपापल्या घरी बनविलेला फराळ संघाच्या कार्यालयात जमा केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी कमल अर्णव चॅरिटेबल ट्रस्ट, नवीन पनवेल आणि बालग्राम महाराष्ट्र, खांदा कॉलनी येथील अनाथ मुलांना त्याचे वितरण केले. या वेळी संघाचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब परब, विद्यमान अध्यक्ष केशव राणे, सचीव बाप्पा मोचेमाडकर, बाबाजी नेरुरकर, बाबू दळवी, वासुदेव सावंत, किशोर सावंत, विनायक तिरोडकर आणि सौरभ राणे आदी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

दिवाळीसारख्या सणांचा आनंद आपण सर्व जण आपल्या कुटुंबासह घेत असतो. हा आनंद  या मुलांनाही मिळावा आणि त्याना आपल्या कुटुंबासारखेच प्रेम मिळावे  या उद्देशाने हा उपक्रम आम्ही केला.

-केशव राणे, अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेल

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply