पनवेल : रामप्रहर वृत्त
स्व. यमुना नचिकेत भोईर यांच्या स्मरणार्थ नवी मुंबई येथील यमुना फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा मातृवदन पुरस्कार सोहळा नुकताच झाला. यामध्ये पनवेलमधील नामवंत गायक गणेश भगत यांना त्यांच्या गायन क्षेत्रातील कार्याची दखल घेत मातृवंदन पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. गणेश भगत हे 1991पासून गायन क्षेत्रात कार्यरत आहेत. टीसीरिज, विनरर्स, विंग्ज, नैना म्युजिक, सम्राट कॅसेट अशा अनेक 1200हून अधिक गाण्यांच्या कंपनींमध्ये काम केले आहे. भगत यांनी आतापर्यंत अडीज हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. मराठीसह कन्नड, तमीळ अशा विविध भाषांमध्ये ते गाणी गातात. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली मी गायन क्षेत्रात कार्य करीत असल्याचे भगत यांनी सांगितले. पुरस्कार सोहळ्याला फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन भोईर, आगरी नेते जयेंद्र खुणे, अॅड मनोज म्हात्रे, प्रा. चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, अनेकांना या वेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन कवयित्री दमयंती भोईर यांनी केले.