Breaking News

उरणमध्ये गडकिल्ले स्पर्धा उत्साहात

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील सारडे विकास मंचतर्फे मुलांना गडकिल्ल्यांचे महत्व आणि माहिती व्हावी यासाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 50 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येकास मंचाचे कार्याध्यक्ष रोहित पाटील यांच्याकडून सन्माचिन्ह देण्यात आले. या स्पर्धेत प्रथम रचित कांति म्हात्रे, द्वितीय निल सुशांत म्हात्रे, उत्तेजनार्थ सुयोग नारायण पाटील, प्रियाल नितीन म्हात्रे तर सहभागी होणार्‍या सर्वांना सहभाग म्हणून बक्षीस देण्यात आले. या वेळी सुयश क्लासेस आवर्रेचे अध्यक्ष निवास गावंड, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि कोप्रोलीचे राकेश पाटील, उरण सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रितेश कोळी, अभिषेख कोळी, अक्षय कोळी, रोहित पाटील, त्रिनज पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी प्रितेश कोळी यांनी गडकिल्ल्यांच्या संदर्भात  सर्व स्पर्धकांना सुंदर मार्गदर्शन केले. तसेच सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply