Breaking News

मुरूडमधील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी 14 उमेदवारी अर्ज दाखल

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीमधील सदस्य पदांच्या 21 रिक्त जागांसाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, राजपुरी, सावली, चोरढे या ग्रामपंचायतीमधील पोटनिवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज न दाखल झाल्याने त्याठिकाणी निवडणूक होणार नाही.

मुरूड तालुक्यातील वावडुंगी, सावली, एकदरा, राजपुरी, मजगाव, उसरोली, चोरढे, कोर्लई या आठ ग्रामपंचायतीमधील सदस्य पदांच्या 21 जागा रिक्त असून, त्यासाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज  शेवटच्या दिवसापर्यंत 14 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

वावंडुगी ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 मधून गोविंद भिकू अदावडे यांनी तर कोर्लई ग्रामपंचायतीच्या प्रभाग 2 मधून जना कृष्णा वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मजगांव ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 मधून वर्षा योगेंद्र गोयजी, अभिनव शांताराम कोळी, जनाबाई रमेश वाघमारे, प्रभाग 2मधून वर्षा योगेंद्र गोयजी, जनाबाई रमेश वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

राजश्री मनिष नांदगावकर, सुनिता संतोष मांदाडकर, समृद्धी प्रशांत पाटील, अश्वनी नितेश पाटील यांनी उसरोली ग्रामपंचायतीच्या प्रभाग 5मधून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

एकदरा ग्रामपंचायतीमधील प्रभाग 3 सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. तेथे दर्शना मधुकर मकु आणि मंगल वामन झुझे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत गुरुवारी (दि. 9) दुपारी 3वाजेपर्यत आहे, त्यानंतर निवडणूकीचे   चित्र स्पष्ट होईल.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply