Breaking News

रमेश पाटील यांना ’समाजरत्न’पुरस्कार

पनवेल ः प्रतिनिधी

सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य, राजकीय आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांचा पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने ’समाजरत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्याबद्दल सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील यांनी रमेश पाटील यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

रमेश पाटील पनवेल तालुक्यातील दुंदरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच असून,  शेकडो रुग्णांना वैद्यकीय सेवा, रिटघर शाळा डिजिटल बनवण्यासाठी मदत, विविध सामाजिक उत्सव, आरोग्यविषयक परिसंवादाचे आयोजन, विशेष म्हणजे आदिवासी बांधवांसाठी त्यांनी विविध योजना राबवण्याबरोबरच सहा आदिवासी जोडप्यांचा, तसेच मागास समाजातील 16 जोडप्यांचा स्वखर्चाने विवाह करून दिला.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply