Breaking News

लसीकरण केंद्रांची संख्या वाढवा

आमदार प्रशांत ठाकूर यांची आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडे मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार ठाकूर यांनी मंत्री टोपे यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण भारतात कोविड-19 महामारीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रभावी शस्त्र म्हणून कोवॅक्सिन व कोविशिल्ड या औषधांचे लसीकरण करण्याची सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या औषधांच्या लसीकरणाचे एक कवच सर्व भारतीयांना प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात आणि पर्यायाने पनवेल महानगरपालिका हद्दीतही लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. महाराष्ट्राबरोबरच पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांच्या मनात ही लस घेतली तर आपल्याला कोरोना होणार नाही अशी भावना मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रांवर लसीकरणासाठी तासन्तास उभे राहून गर्दी करीत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढणार आहे.
लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिका हद्दीत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यासंदर्भात संबंधितांना आदेश द्यावेत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनात अधोरेखित केले आहे.

Check Also

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम

स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार, लोकप्रतिनिधी सत्कार, गुणीजनांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तकष्टकऱ्यांचे द्रष्टे …

Leave a Reply