Breaking News

पनवेल महापालिकेच्या डॉक्टरांचा सन्मान

पनवेल : प्रतिनिधी

कोरोनाने दीड वर्षापासून सार्‍या जगाला हादरवून सोडले आहे. या महामारीच्या काळात पनवेल महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटूंबीयांची पर्वा न करता रात्रंदिवस काम केले. त्यांच्या या कामाचा सन्मान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलातर्फे करण्यात आला.

खारघर येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या कार्यालयात  मंगळवारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे पश्चिम विभाग मुख्यालयाचे इन्स्पेक्टर जनरल आयपीएस अधिकारी के.एन. त्रिपाठी, डेप्यूटी इन्स्पेक्टर जनरल डॉ. मनोज कुमार शर्मा यांच्या हस्ते महापालिकेच्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे वेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे इन्स्पेक्टर धर्मपाल सोमकुमार व इतर अधिकारी उपस्थित होते

या वेळी महापलिकेचे मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिषा चांडक, डॉ. अश्विनी देगावकर, डॉ. रोमा, डॉ. वर्तिका, डॉ. कोमल, लॅब टेक्निशियन शिवम, फार्मासिस्ट शितल यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. दरम्यान, कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेविषयी चर्चा करण्यात आली. तसेच भविष्यातही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाला महापालिका मदत करेल, असे आश्वासन डॉ. गोसावी यांनी या वेळी दिले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply