Breaking News

खारघरमध्ये कृत्रिम फुप्फुसांचे महापौरांच्या हस्ते अनावरण

खारघर : प्रतिनिधी

खारघर शहरातील वातावरण फाऊंडेशनतर्फे खारघर सेकटर 7 येथील उत्सव चौक येथे श्वास घेणार्‍या कृत्रिम फुप्फुसांची (लंग्जबिलबोर्ड)चे पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते शनिवारी (दि. 16) अनावरण करण्यात आले.

नुकतेच हवा प्रदूषणासंदर्भात वातावरण फाऊंडेशनने संशोधनपर अभ्यास केला. या संशोधन अभ्यासाअंती समोर आलेल्या माहितीनुसार खारघर-तळोजा-पनवेल येथील रहिवासी दिवसभरात 17 तास प्रदूषित हवेत श्वास घेत असल्याचे व विशेषतः सकाळी सहा ते आठ या वेळेत पीएम 2.5 (पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट) कणांची पातळी सर्वाधिक नोंदवली गेली असल्याचे समोर आले आहे.

उभारण्यात आलेल्या लंग्जबिलबोर्ड फिल्टर मीडियापासून तयार केले असून ते शुभ्र पांढर्‍या रंगाचे आहेत. या बिलबोर्डला मागे बाहेर हवा फेकणारे पंखे बसवण्यात आले आहेत. जशी मानवी श्वसनाची प्रक्रिया काम करते तसेच हे बिलबोर्ड काम करत आहेत. या बिलबोर्डवर एक हवेची गुणवत्ता तपासणारे यंत्र (रिअल-टाईम एअर क्वालिटी मॉनिटर) बसवण्यात आले आहे. जे प्रत्येक क्षणाची हवेची गुणवत्ता दर्शवते महिन्याभरात ही शुभ्र पांढर्‍या रंगाची फुप्फुसे हळूहळू काळी पडत जातील त्यानुसार संबंधित परिसरातील हवा किती खराब आणि अशुद्ध आहे त्याबद्दल नागरिकांना समजेल. हे बिलबोर्ड लावण्याचा उद्देश म्हणजे लोकांच्या आरोग्यावर, त्यांच्या फुप्फुसांवर हवा प्रदूषणाचा काय दुष्परिणाम होत आहे हे दृश्य स्वरुपात दाखवण्यासाठीचा प्रयोग असल्याचे केसभट

यांनी सांगितले.

या वेळी उपस्थितांमध्ये महापौर डॉ. कविता चौतमोल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, नगरसेवक निलेश बाविस्कर आदींसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply