Breaking News

खांदा कॉलनी, खारघरमध्ये छट्पूजा उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले दर्शन; भाजपतर्फे भाविकांसाठी उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

दिवाळीनंतर कार्तिक महिन्यात उत्तर भारतात छट्पर्व मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते. त्यानिमित्त खांदा कॉलनी आणि खारघर येथे छट्पूजा उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध ठिकाणी भेट देऊन छट्पूजेचे दर्शन घेतले. खारघर येथे छटपुजेसाठी आलेल्या भाविकांना भाजपच्या वतीने फळांचे आणि अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, कीर्ती नवघरे, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, अमर उपाध्याय, समीर कदम, महिला मोर्चाच्या गीता चौधारी, बिना गोगरी, तसेच खांदा कॉलनी येथे छट्पूजेच्या वेळी नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे, भाजप नेते भिमराव पोवार, वंदे मातरम संघटनेचे मोतीलाल कोळी, युवा मोर्चा पनवेल शहर उपाध्यक्ष अभिषेक भोपी, रामनाथ पाटील, जितेंद्र तिवारी, अवधेश शुक्ला, अनुपम शर्मा, श्रवण झा, अनिला देवी, धर्मेंदर सिंग, सुनीता सवेना, नरेश ठाकूर आदी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यात आमदार आपल्या दारी!

उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत व्यक्त केले समाधान पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे वसाहतीत आमदार प्रशांत ठाकूर …

Leave a Reply