मुंबई : प्रतिनिधी
राज्यभरात ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकतर्फी टीका करणार्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडीओला जशास तसं उत्तर देण्यासाठी भाजपही सज्ज झाली आहे.
येणार्या 27 तारखेला भाजपकडून मनसे स्टाईलने लाव रे तो व्हिडीओ असं सांगत मनसेचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. राज ठाकरे यांच्याकडून मांडत असलेल्या मुद्द्यांची वस्तुस्थिती मांडण्यासाठीच भाजप जाहीर व्यासपीठावर राज ठाकरे यांनी केलेल्या दाव्याची पोलखोल करणार आहे.