Breaking News

केंद्राप्रमाणे राज्यानेही पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करावेत

महाड भाजपची मागणी, तहसीलदारांना निवेदन सादर

महाड : प्रतिनिधी

वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पुढ टाकत पेट्रोल, डिझेलवरील करांमध्ये सुट दिली असून आता राज्य सरकारनेसुध्दा कर कमी करावेत, अशी मागणी महाड भाजपच्या वतीने शुक्रवारी (दि. 12) करण्यात आली.

वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले आहेत. महाराष्ट्रतील महाविकास आघाडी सरकारनेदेखील कर कमी केले तर पेट्रोल, डिझेलच्या दरात आणखी घट होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल.

मात्र आज दहा दिवस होऊनही हे आघाडी सरकार कर कमी करण्यास तयार नाही. त्या विरोधात आता महाड भाजप आक्रमक झाली असून राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलवरील विक्रीकर कमी करावा तसेच पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावेत, अशी मागणी केली आहे.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, सरचिटणीस महेश शिंदे, डॉ. मंजुशा कुद्रीमोती, शहर अध्यक्ष निलेश तळवटकर, युवा मोर्चा अध्यक्ष सुमित पवार, विभाग अध्यक्ष गणेश फिलसे आदींच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महाड तहसीलदारांची भेट घेऊन राज्य सरकारला देण्यासाठी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply