Breaking News

करंजाडे येथील पावसाळी नाला बंदीस्त करा

भाजप नेते किरण मुंबईकर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

करंजाडे सेक्टर 2 व 2 ए येथील पावसाळी नाला बंदिस्त करण्यात यावा, अशी मागणी भाजप पनवेल तालुका चिटणीस किरण मुंबईकर यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या नवीन पनवेल येथील अभियंत्यांना निवेदन दिले आहे.

मुंबईकर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे,  सिडकोच्या विभागामार्फत करंजाडे वसाहतीमध्ये डोंगरभागाकडून येणारे पावसाचे पाणी खाडीपर्यंत जाण्यासाठी सेक्टर 1, सेक्टर 2 व सेक्टर 2 ए या भागातील वसाहतीमधून पावसाळी नाला तयार करण्यात आला आहे. सदर नाला सेक्टर 1 मध्ये बंदिस्त आहे, मात्र सेक्टर 1 पासून पुढे सेक्टर 3 पर्यंत हा नाला उघडा आहे. त्यामुळे पावसाळ्यात नाला तुडुंब भरून नाल्यातील पाणी आजूबाजूला पसरत आहे. मुळात हा नैसर्गिक नाला नाही व त्याची बांधणीही सेक्टर 1 पासून पुढे नाल्यासारखा केली गेलेली नाही. याच नाल्याच्या मार्गात सिडकोचे नियोजित मँगोगाईनही येणार आहे.

या नाल्याचे काम त्रिवेणीधाम मंदिरापर्यंत अर्धवट अवस्थेत झालेले आहे. त्यामुळे या नाल्यातील पाणी पुढे सेक्टर 3 मधील मुख्य नाल्यापर्यंत व्यवस्थितरीत्या पोहचत नाही, पाणी तसेच साठून राहत नाहे. या संपूर्ण भागात निवासी इमारती असल्याकारणाने या नाल्यातील साठलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून मलेरिया, डेंग्यू, चिकणगुनिया यासारख्या रोगांचा प्रसार या भागात दरवर्षी होतो आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.

सिडकोच्या विभागामार्फत या नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करून सेक्टर 1 पासून सेक्टर 3 पर्यंत चांगल्याप्रकारे बांधणी करून हा नाला बंदिस्त करावा जेणेकरून वसाहतीमध्ये पाणी साठून न राहता हे पाणी सेक्टर 3 मधील मुख्य नाल्यापर्यंत जाईल.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply