पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने राज्य पॉवरलिफ्टिंग सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनिअर, मास्टर (40, 50, 60 वर्षावरील) अशा विविध पुरुष आणि महिलांची स्पर्धा नुकतीच पुणे येथे झाली. या स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी तीन सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकून आपला ठसा उमटविला.
पुणे धायरीतील समृद्धी लॉन्सन्हरे येथे स्पर्धा झाली. या स्पर्धेचे आयोजन पुण्याच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रुतिका राऊत, नीता मेहता आणि मयानी कांबळे या तिघींनी मिळून केले होते, तर महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सरदेसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेत रायगडच्या महेश पाटील (मास्टर गट), अथर्व लोधी (सब ज्युनिअर)कुणाल पिंगळे (ज्युनिअर) यांनी सुवर्ण, संतोष गावडे, दिनेश पवार, मयुरा अंगत (मास्टर गट), सुहानी गावडे (सब ज्युनिअर गट), हृतिक पोळ (ज्युनिअर गट), शुभम कांगले (सीनिअर गट) यांनी रौप्य, तर दिव्या महाडिक, संस्कार सरदार, सम्यक गायकवाड यांनी कांस्यपदक पटकाविले. खेळाडूंच्या यशाबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडच्या सर्व पदाधिकार्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …