Breaking News

खोपोली पालिकेकडून स्वच्छतादूतांचा सन्मान

खोपोली : प्रतिनिधी

स्वच्छता अभियानात सहकार्य केलेल्या सामाजिक संघटना, कंपनी, तसेच सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांचा खोपोली नगर परिषदेच्या वतीने गुरुवारी (दि. 1) स्मृतिचिन्ह, पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण 2019 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सन्मान, तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2020च्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन शहरातील छत्रपती शाहू महाराज सभागृहात करण्यात आले होते. आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून सुरुवात करावी, या अभियानात प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांनी प्रास्ताविकात केले. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी व्यक्त केले. इंडिया बुक रेकॉर्डचे डॉ. संदीप सिंग यांनी या समारंभात इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे स्मृतिचिन्ह नगराध्यक्षा सुमन औसरमल यांना दिले. त्यानंतर स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी ज्यांनी योगदान दिले, त्या सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे सहाय्यक अयुक्त संजय शिंदे यांच्यासह नगर परिषदेचे सर्व समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविका व अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमिला सुर्वे यांनी आभार मानले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply